mehboob shaikh praises mp amol kolhe video : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात केली आहे. पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेला सुरुवात झाली. त्या निमित्तानं जुन्नरमध्ये शुभारंभाचा मेळावा झाला. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस अध्यक्ष मेहबूब शेख यांनी तडाखेबंद भाषण केलं. अजित पवार यांच्या पक्षावर टीकेची झोड उठवताना मेहबूब शेख यांनी खासदार अमोल कोल्हे यांचं तोंडभरून कौतुक केलं. सगळे सोबत असताना अमोल कोल्हे हे निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. पण जेव्हा अनेक आमदार शरद पवार साहेबांना सोडून गेले, तेव्हा अमोल कोल्हे हे पवार साहेबांसोबत ठामपणे उभे राहिले, याची आठवण शेख यांनी करून दिली.