मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : मृतांना अ‍ॅडमिट केले, त्यांच्यावर उपचार केले, डिस्चार्ज दिला आणि परतीचा प्रवास खर्चही दाखवला! हे प्रकरण ऐकाच!

Video : मृतांना अ‍ॅडमिट केले, त्यांच्यावर उपचार केले, डिस्चार्ज दिला आणि परतीचा प्रवास खर्चही दाखवला! हे प्रकरण ऐकाच!

Jul 09, 2024 07:06 PM IST

Jayant Patil reveals big scam in vidhan sabha : कोविड महामारीच्या काळात एका रुग्णालयानं मेलेल्या व्यक्तींना जिवंत दाखवून सरकारकडून मिळणारे पैसे लाटले. या प्रकरणातील मुख्य आरोपी हे भाजपचे आमदार जयकुमार गोरे आहेत, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केला. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मौजे मायणी इथं श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या संस्थेच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या नावानं वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. सन २०२० मध्ये देशभरात कोरोना रोगाचा संसर्ग व फैलाव झाला होता.  कोविड - १९ च्या रुग्णांवर उपचार करताना या रुग्णालयाचे तत्कालीन अध्यक्ष, सचिव, खजिनदार व इतरांनी महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी अनेक मयत लोकांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार केल्याचं आढळून आलं आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp