Video : …तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही; मस्साजोग गावातून शरद पवार यांचा इशारा
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : …तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही; मस्साजोग गावातून शरद पवार यांचा इशारा

Video : …तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही; मस्साजोग गावातून शरद पवार यांचा इशारा

Dec 21, 2024 11:22 PM IST

Sharad Pawar in Massajog : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाला भेट दिली. शरद पवार यांनी हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. कुटुंबीयांच्या अडचणी समजून घेतल्या. देशमुख कुटुंबातील मुलं काय करतात याचीही माहिती घेतली. गावकऱ्यांनीही आपल्या व्यथा शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. शरद पवार यांनी देशमुख कुटुंबीयांना धीर दिला. आम्ही सगळ्या आपल्या पाठीशी आहोत. तुम्ही एकटे नाही, असं त्यांनी सांगितलं. राज्य सरकार व केंद्र सरकार संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मुळाशी जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी खासदार बजरंग सोनवणे, खासदार नीलेश लंके, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार संदीप क्षीरसागर हे देखील उपस्थित होते.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp