Sharad Pawar in Massajog Video : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाला भेट दिली. शरद पवार यांनी हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. कुटुंबीयांच्या अडचणी समजून घेतल्या. देशमुख कुटुंबातील मुलं काय करतात याचीही माहिती घेतली. गावकऱ्यांनीही आपल्या व्यथा शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. शरद पवार यांनी देशमुख कुटुंबीयांना धीर दिला. आम्ही सगळ्या आपल्या पाठीशी आहोत. तुम्ही एकटे नाही, असं त्यांनी सांगितलं. यावेळी खासदार बजरंग सोनवणे, माजी मंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थित होते.