Video : भाजपला पुण्यात विशिष्ट समाजाची मतं मिळतात तेव्हा आम्ही त्याला 'व्होट जिहाद' म्हणत नाही - शरद पवार
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : भाजपला पुण्यात विशिष्ट समाजाची मतं मिळतात तेव्हा आम्ही त्याला 'व्होट जिहाद' म्हणत नाही - शरद पवार

Video : भाजपला पुण्यात विशिष्ट समाजाची मतं मिळतात तेव्हा आम्ही त्याला 'व्होट जिहाद' म्हणत नाही - शरद पवार

Nov 16, 2024 04:12 PM IST

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपकडून महाविकास आघाडीवर होणाऱ्या व्होट जिहादच्या आरोपांना उत्तर दिलं. व्होट जिहाद हा शब्द आम्ही कधीच वापरलेला नाही. भाजप, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी हे सगळं करत आहेत. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न यातून दिसतो. एखाद्या मतदारसंघात एखाद्या समाजाची संख्या जास्त असते. पुण्यातल्या काही भागात एक विशिष्ट समाज आहे. हिंदू समाज आहे, त्यांनी भाजपला जास्त मतदान केलं म्हणून आम्ही त्याला व्होट जिहाद म्हणत नाही. कारण, इथं असंच होणार याची आम्हाला सवय झाली आहे. व्होट जिहाद वगैरे कल्पनांना आमचा विरोध आहे, असं शरद पवार म्हणाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp