Sharad Pawar speech video : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी पुण्यातील खराडी इथं नुकतीच जाहीर सभा घेतली. आपल्या कार्यकाळात पुण्याच्या झालेल्या औद्योगिक व शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी यावेळी पुण्यातील सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. अजित पवार यांच्या सोबत गेलेले आमदार सुनील टिंगरे यांच्यावर शरद पवार यांनी जोरदार हल्ला चढवला. लोकांनी आमच्या पक्षाच्या विचारांवर विश्वास ठेवून याला निवडून दिला. पण हा लोकांसाठी काम करण्याऐवजी त्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहे. हा दिवटा आमदार चुकीच्या लोकांना मदत करत आहे, अशी तोफ शरद पवार यांनी डागली.