Sharad Pawar on election Results : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला व महायुतीनं जोरदार मुसंडी मारली. या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. ईव्हीएमच्या आरोपांबाबत त्यांनी बोलणं टाळलं. माझ्याकडं त्याबाबत ठोस माहिती नाही. त्यामुळं त्यावर बोलणं योग्य होणार नाही, असं ते म्हणाले. निकालाच्या दुसऱ्या दिवशी एखादा घरी बसला असता पण मी आज कराडमध्ये आहे. मी घरी बसणार नाही. आमच्यासोबत काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना ताकद देणं हे माझं काम आहे, असं शरद पवार म्हणाले.