Sharad Pawar latest news : विधानसभा निवडणुकीत काही जागांवर उमेदवार उतरवण्याची भूमिका घेणारे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज अचानक माघार घेतली. महाविकास आघाडीच्या सांगण्यावरूनच त्यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप महायुतीनं केला होता. त्यावर शरद पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली. 'मनोज जरांगे यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा निर्णय आहे. त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. मात्र त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे. त्यामुळं मला आनंद झाला. कारण, त्यांचा विरोध भाजपला आहे. त्यांनी उमेदवार उभे केले असते तर त्याचा फायदा भाजपला झाला असता, असं पवार म्हणाले.