Sharad Pawar praises Harshvardhan Patil : भारतीय जनता पक्ष सोडण्याचा निर्णय घेणारे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांचं जोरदार कौतुक केलं. 'हर्षवर्धन पाटलांचं मन इकडं होतं. निर्णय घ्यायला उशीर झाला, पण तो निर्णय झाला. याचा मला आनंद आहे. हा निर्णय फक्त इंदापूरपुरता मर्यादित नाही. महाराष्ट्राच्या ऊसाच्या धंद्याला मदत करणारा हा निर्णय आहे. राज्याच्या समाजकारणाला शक्ती देणारा निर्णय आहे, असं शरद पवार म्हणाले. हर्षवर्धन यांच्या बाबतीत काळजी करण्याची गरज नाही. जावई कोणाचा आहे? आम्ही कुठंही मुलगी देत नाही. महाराष्ट्राचा संसार नीट चालवण्याची ताकद या जावयात आहे, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.