Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी आज मतदान सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही बारामती इथं मतदानाचा हक्क बजावला. 'लोकांनी मतदान केले पाहिजे आणि महाराष्ट्रातील लोक मोठ्या संख्येने शांततेत मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुप्रिया सुळे व नाना पटोले यांच्यावर झालेल्या कथित बिटकॉइन घोटाळ्याच्या आरोपांवरही ते बोलले. 'आरोप करणारी व्यक्ती अनेक महिने तुरुंगात होती आणि त्या व्यक्तीला सोबत घेऊन खोटे आरोप करणे, हे फक्त भाजपच करू शकतं, असं ते म्हणाले. त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचाच होता, असं म्हणणाऱ्या अजित पवार यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली. 'कोणत्या पातळीला जावं ह्याचं तारतम्य सुद्धा पाळलं जात नाही,' असं शरद पवार म्हणाले.