Sharad Pawar pune PC video : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या निर्माण झालेल्या कटू वातावरणावर शरद पवार यांनी यावेळी उपाय सुचवला. आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्यात राज्यातील प्रमुख नेते व आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील वगैरे नेत्यांना बोलवावं, असं शरद पवार म्हणाले. त्यात आमची भूमिका सहकार्याची राहील, अशी ग्वाही पवार यांनी दिली.