Sharad Pawar offer prayers at Lalbaugcha Raja : महाराष्ट्रात प्रसन्न व मंगलमय वातावरणात गणेशोत्सव सुरू असून प्रसिद्ध मंडळांच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग लागली आहे. राजकीय नेतेही या रांगेत आहेत. उद्धव ठाकरे, अमित शहा यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची नातवंडंही होती.