NCP Protest against Abdul Sattar Video: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात अत्यंत घाणेरडा शब्दप्रयोग करणारे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केली आहेत. मुंबईतील शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धडक देत जोरदार निदर्शनं केली. यावेळी सत्तार यांच्या बंगल्याच्या काचा फोडण्यात आल्याचं समजतं.