Jayant Patil praises Narayan Rane : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली. त्यानंतर वडेट्टीवार यांच्या अभिनंदन प्रस्तावावर भाषणं झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी यावेळी वडेट्टीवार यांच्या राजकीय प्रवासाचं व लढवय्या वृत्तीचं कौतुक केलं. विरोधी पक्षनेता हे पद किती महत्त्वाचं असतं हे सांगताना जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्या कार्यकाळाची आठवण करून दिली. नारायण राणे हे विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी नुसतं वळून बघितलं तरी सगळे आमदार खाली बसायचे. एवढा त्यांचा प्रभाव आणि दरारा होता. विविध विषयांचा अभ्यासही त्यांचा चांगला होता. अनेक भाषणं त्यांनी केली. अर्थसंकल्पावरील त्यांचं भाषण अत्यंत उत्कृष्ट असायचं. त्यांचं भाषण ऐकून सरकारनं अर्थसंकल्प चुकीचा मांडलाय की काय अशी शंका कोणालाही यावी, असं पाटील म्हणाले.