Chhagan Bhujbal on Onion Price : भाव पडल्यामुळं मेटाकुटीस आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकासाठी क्विंटलमागे ३०० रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. मात्र, ही मदत अत्यंत तुटपुंजी आणि शेतकऱ्यांचा अपमान करणारी आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. आपल्यापेक्षा छोटं राज्य असताना व महाराष्ट्राच्या तुलनेत अत्यंत कमी कांदा उत्पादक असतानाही गुजरात सरकारनं ३५० कोटी रुपयांचं अनुदान दिलं आहे. आपल्या सरकारला हे का जमत नाही,' असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी केला आहे.