ajit pawar apology video : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्रात जनसन्मान यात्रेची सुरुवात केली आहे. ही यात्रा सध्या नाशिकमध्ये असून इथं झालेल्या सभेत अजित पवार यांनी राज्य सरकारच्या कामाचा पाढा वाचला. कांदा निर्यातीच्या बाबतीत आमच्या चुका झाल्या. लोकसभेला आम्हाला मोठा झटका बसलाय. आता माफ करा. चूक झाली, कबुल करतो, असं अजित पवार म्हणाले. गरिबाला केंद्रस्थानी ठेवून आमच्या सरकारचं काम सुरू आहे, असंही ते म्हणाले.