Sharad Pawar hit back at PM Modi : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांना उत्तरं दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या व्यक्तिगत टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. सुप्रिया सुळे यांचं भलं करायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या, असं मोदी म्हणाले होते. त्याचाही पवारांनी समाचार घेतला. बापजाद्यांच्या पुण्याईवर एखाद्या वेळेस निवडून येता येतं, पण प्रत्येक वेळी जनता मतं देत नाही. माझी मुलगी तीन वेळा निवडून आलीय आणि आठ वेळा तिला उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळालाय. कर्तृत्व असल्याशिवाय हे होत नाही, असं पवार म्हणाले. देशातील एकूण वातावरण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेलंय. त्या अस्वस्थतेतून मोदी अशा प्रकारचे हल्ले करतायत, असंही पवार म्हणाले.