Navjot Sidhu on Manmohan Singh : प्रख्यात अर्थतज्ज्ञ व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं २६ डिसेंबर रोजी निधन झालं. मनमोहन सिंह हे तब्बल ३३ वर्षे संसदेचे सदस्य होते. देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या आणि भारताला जगाची कवाडे खुली करून देणाऱ्या मितभाषी मनमोहन यांना जगभरातून आदरांजली वाहिली जात आहे. या पार्श्वभूमीवर नवज्योत सिंग सिद्धू यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात नवज्योत सिद्धू यांनी मनमोहन सिंग यांची जाहीर माफी मागितली होती. तसंच, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं आणि स्वभावाचं तोंडभरून कौतुक केलं होतं.