Lok Sabha Video : सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर आज लोकसभा अध्यक्षांची निवड झाली. भाजपचे खासदार ओम बिर्ला यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाली. निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी बिर्ला यांना अध्यक्षांच्या आसनापर्यंत नेले. त्यावेळी मोदी आणि राहुल गांधी यांनी हस्तांदोलन केलं. तसंच, एकमेकांसोबत अध्यक्षांच्या आसनापर्यंत चालत गेले. निवडणुकीत एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची ही अनोखी युती चर्चेचा विषय ठरली होती.