Mumbai Pune Express Highway Accident Video : मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर विचित्र अपघात झाला आहे. खोपोली एक्झिटजवळ ७ ते ८ वाहनांनी एकमेकांना धडक दिली. या अपघातात वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, तर काहीजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना खोपोली येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.