Gadchiroli Premier League Inauguration : गडचिरोली प्रीमियर लीगच्या उद्घाटनाचा सोहळा भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याच्या उपस्थितीत झाला. यावेळी अझरुद्दीननं गडचिरोलीतील मैदानाचं व क्रिकेटपटूंच्या प्रगतीसाठी होत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं. इथल्या क्रिकेटपटूंना माझ्याकडून काही मदत हवी असल्यास मी त्यासाठी कधीही तयार आहे, असं आश्वासन त्यानं दिलं.