raj thackeray PC video : राज ठाकरे यांच्या नांदेड दौऱ्याच्या वेळी शिवसैनिकांनी त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकून आंदोलन केलं. त्यामुळं राज ठाकरे संतापले आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे स्वत:च्या राजकारणासाठी मराठा समाजाच्या आडून भांडणं लावण्याचे उद्योग करत आहेत. माझ्या विरोधात मराठा समाजाला भडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ह्यांनी राजकारणाचा चिखल करून ठेवला आहे. त्यांनी माझ्या नादी लागू नये, नाहीतर एकही सभा घेता येणार नाही, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला.