Raj Thackeray : ठाणे विधानसभेचे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली. महाराष्ट्रातील फोडाफोडी आणि पळवापळवीच्या राजकारणावर प्रचंड संताप व्यक्त केला. ही निवडणूक महाराष्ट्राचं भवितव्य घडवणारी आहे. यावेळी तुम्ही पुन्हा त्यांनाच निवडून दिलं तर महाराष्ट्राला कुणीही वाचवू शकणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले. राज्यातील मतदारांची अवस्था मुन्नाभाई सिनेमातील संजय दत्त आणि अर्षद वार्सीसारखी झाली आहे, असं राज ठाकरे म्हणाले.