Raj Thackeray Latest Speech : मनसेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज मुंबईत पार पडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळाव्यास मार्गदर्शन करताना भाजपसह विविध पक्षांवर जोरदार तोफ डागली. माझ्या नेहमी भूमिका बदलल्याचा आरोप होतो. पण कोणत्या पक्षानं भूमिका बदलल्या नाहीत? भाजपनं आजवर काय-काय केलं. भाजपनं ज्यांच्या-ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे आज मंत्रिमंडळात आहेत. पण यांना कोणी विचारायला जात नाही, केवळ मनसेची बदनामी करतात, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.