Raj Thackeray Thane Speech : ठाणे विधानसभेचे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणूक चिन्ह घड्याळ यावरही राज ठाकरे बोलले. धनुष्यबाण ही एकनाथ शिंदे यांची प्रॉपर्टी नाही आणि घड्याळ ही अजित पवारांची प्रॉपर्टी नाही, असं राज ठाकरे म्हणाले.