Rajesh Yerunkar on Maharashtra Election results : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एकतर्फी निकालाचा राजकीय पक्षांसह त्यांच्या उमेदवारांना व समर्थकांना धक्का बसला आहे. अनेकांनी सत्ताधाऱ्यांवर ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला आहे. मनसेचे दहिसर विधानसभेचे उमेदवार राजेश येरुणकर यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ‘माझी आई आणि बायकोनंही मला मत दिलं नाही असं कसं होईल’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.