Mithi River video : पुण्याबरोबच मुंबई शहरालाही पावसानं जोरदार तडाखा दिला आहे. या पावसामुळं मुंबईतील अनेक भागांत पाणी साचलं आहे. विलेपार्ले, कालिना, चेंबूर, साकीनाका, घाटकोपर, अंधेरी यांसह अनेक भागांत ठिकठिकाणी पाणी तुंबलं आहे. मुंबईतील मिठी नदी तुडुंब भरली आहे. त्यामुळं आसपासच्या परिसरात चिंतेचं वातावरण आहे.