Mehboob Shaikh on ajit pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सध्या बीड जिल्ह्यात आहे. या निमित्तानं केजमध्ये पक्षाचा मेळावा झाला. मेळाव्याला मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी जोरदार भाषण झालं. बीडची जागा कशी निवडून आली हेही मेहबूब शेख यांनी सांगितलं. नाइन्साफी के खिलाफ उठनेवाली आवाज को चीड कहते है... इन्कलाब की इस धरती को बीड कहते है... असा शेर शेख यांनी ऐकवला. यावेळी त्यांनी बजरंग सोनवणे यांचं कौतुक केलं. सोनवणे यांची लायकी काही लोकांनी काढली होती, पण त्यांची लायकी देशाच्या सर्वोच्च सभागृहात आहे हे लोकांनी दाखवून दिलं. अजित पवार यांच्यावर शेख यांनी जोरदार टीका केली.