Jayant Patil Speech Video : माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आज मुंबईतील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांनी पक्षात त्यांचं स्वागत केलं. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वर्गातील सामाजिक संघटना पवार साहेबांच्या पक्षाशी संलग्न होण्याचा प्रयत्न करतायत. आता सुधाकर भालेरावांच्या रुपानं आम्हाला एक धारदार आणि बहारदार व्यक्तिमत्व लाभलं होतं. गद्दारीची नामशेष करण्यासाठी मोठ्या विश्वासानं आम्ही तुम्हाला जबाबादारी दिली आहे. शिवरायांपासूनचा इतिहास आहे, मराठी माणसाला गद्दारी आणि फसवणूक आवडत नाही. तुम्ही मोठा विजय खेचून आणाल आणि गद्दारांना प्रायश्चित्त द्याल, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.