Jayant Patil on Maha Assembly Elections : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज शिवस्वराज्य-२ यात्रेची घोषणा केली. येत्या ९ ऑगस्टला शिवनेरी किल्ल्यावरून यात्रेची सुरुवात होणार आहे. राज्यातील सरकारच्या भ्रष्ट आणि चुकीच्या कारभाराविरोधत जनजागरण करणं हा यात्रेचा उद्देश आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दिली. लोकसभा निवडणूक झाल्यापासून राज्यातील महायुती सरकार घाबरलं आहे. त्यामुळं ऑक्टोबरमध्ये होणारी निवडून नोव्हेंबरपर्यंत पुढं ढकलण्याचा विचार सुरू आहे. तोपर्यंत वेगवेगळ्या घोषणा करून राज्याची तिजोरी रिकामी करण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.