Sachin Tendulkar voting video : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी आज मतदान सुरू आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि त्यांची मुलगी सारा तेंडुलकर यांनी मुंबईतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदान सचिन तेंडुलकर यांना सर्व नागरिकांना मतदानाचं आवाहन केलं. 'मी गेल्या काही काळापासून भारतीय निवडणूक आयोगाचा आयकॉन आहे. 'मी मतदान करण्याचा संदेश देत असतो. ही आपली जबाबदारी आहे. मी सर्वांना विनंती करतो. बाहेर या आणि मतदान करा, असं सचिन म्हणाला.