Raj Thackeray on Reservation : राज्यातील आरक्षणाच्या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षण हे आर्थिक विषयावर असावं ही माझी पक्षाच्या स्थापनेपासूनची भूमिका आहे. इतकंच काय, महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही असंही माझं मत आहे, असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र हे देशातील सर्वात उत्तम राज्य आहे. इथं रोजगार व्यवस्थित मिळाले तर आरक्षणाची गरजच नाही, असा युक्तिवाद राज ठाकरे यांनी केला.