मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : विधानभवनात श्रीखंडाचे डबे; शिंदे सरकारचा जोरदार निषेध

Video : विधानभवनात श्रीखंडाचे डबे; शिंदे सरकारचा जोरदार निषेध

Dec 22, 2022 03:12 PM IST Ganesh Pandurang Kadam
Dec 22, 2022 03:12 PM IST

Maharashtra Assembly Winter Session : महाविकास आघाडीच्या आमदारांनी भूखंडाचा श्रीखंड वाटून आज शिंदे सरकारचा निषेध केला. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. घेतले खोके, भूखंड ओके... दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे... राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव... धिक्कार असो, धिक्कार असो, मिंधे सरकारचा धिक्कार असो... बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे... राजीनामा द्या, राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या... महापुरुषांचा अपमान करणार्‍या भाजप सरकारचा धिक्कार असो... भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या सरकारचा धिक्कार असो... भूखंडाचा श्रीखंड खाल्ला कुणी, मुख्यमंत्री मुख्यमंत्री... गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न... अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. 

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp