Abdul Sattar : शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान करणारे मंत्री अब्दुल सत्तार विरोधकांच्या रडारवर
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Abdul Sattar : शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान करणारे मंत्री अब्दुल सत्तार विरोधकांच्या रडारवर

Abdul Sattar : शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान करणारे मंत्री अब्दुल सत्तार विरोधकांच्या रडारवर

Updated Mar 14, 2023 03:38 PM IST

Opposition Protest at Vidhan Bhavan Video : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही काही आजची गोष्ट नाही, असं विधान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं होतं. त्यावरून विरोधकांनी सत्तार यांना घेरलं आहे. असंवेदनशील कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा... गद्दार सत्तार हाय हाय... शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तार यांचा धिक्कार असो... किसानों के गद्दारोंको जुते मारो सालों को... शेतकऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो... पन्नास खोके एकदम ओके... बोलाचीच कढी बोलाचिच भात जेवोनिया तृप्त कोण झाला... यंदाचा अर्थसंकल्प वाया गेला...अशा घोषणा आमदारांनी दिल्या.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp