Saif Ali Khan Health Update : मुंबईतील राहत्या घरी चोरट्यानं हल्ला केल्यामुळं गंभीर जखमी झालेला अभिनेता सैफ अली खान यांच्या प्रकृतीची माहिती लीलावती रुग्णालयाचे चीफ न्यूरो सर्जन डॉ. नितीन डांगे यांनी शुक्रवारी दिली. सैफची प्रकृती उत्तम आहे. त्याला आज आम्ही चालायला सांगितलं. तो चालला. त्याला अर्धांगवायूचा वगैरे कुठलाही धोका नाही. त्याला ICU मधून बाहेर आणण्यात आलं आहे. मात्र काही दिवस त्याला विश्रांती घ्यावी लागणार आहे, असं डांगे यांनी सांगितलं.