Anil Parab Press conference video : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे गंभीर आरोप केले. अनिल परब यांनी या प्रकरणाची कागदपत्रंही दाखवली. किरीट सोमय्या यांनी रामदास कदम यांच्या घोटाळ्याच्या विरोधात आवाज उठवावा. ईडी चौकशीची मागणी करावी. त्यांना हे प्रकरण समजलं नसेल तर मी त्यांना समजवेन, असं अनिल परब म्हणाले. किरीट सोमय्या यांनीच आवाज का उठवावा असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर अनिल परब यांनी कारणही सांगितलं. 'किरीट सोमय्या हे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढत असतात. त्यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायची सुपारी घेतली आहे. रामदास कदम यांनीच पुढाकार घेऊन आमच्या विरोधात किरीट सोमय्याला पुरावे दिले होते. त्यानंतर सोमय्या तावातावानं आरोप करत होते. ते महाराष्ट्रातील तथाकथित अण्णा हजारे आहेत. आता त्यांनी हिंमत दाखवावी,' असं परब यांनी सुनावलं.