Maharashtra Assembly Election video : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पारोळा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सतीश पाटील यांच्या प्रचारासाठी नुकतीच शरद पवार यांची सभा झाली. यावेळी कराळे मास्तरांचंही भाषण झालं. कराळे मास्तरांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली. लाडकी बहीण योजनेप्रमाणे कृषी सन्मान योजना देखील निवडणुकीवर डोळा ठेवून राबवण्यात आली होती. अनेकांना पैसे आले. मलाही आले होते. पण निवडणूक होताच मला नोटीस आली आणि पैसे भरायला लावले. लाडक्या बहिणींनाही तशी नोटीस येण्याची शक्यता आहे, असा इशारा कराळे मास्तरांनी यावेळी दिला.