video : मागच्या ७० वर्षांत असा निर्णय झाला नाही; महिला आरक्षणावर काय म्हणाली कंगना?
Kangana Ranaut on Women Reservation : संसदेच्या विशेष अधिवेशनात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं महिला आरक्षण विधेयक मांडण्याची घोषणा केली. त्यासाठी लवकरच घटनादुरुस्ती विधेयक मांडलं जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे. भाजप समर्थक अभिनेत्री कंगना राणावत हिनं या विधेयकांचं जोरदार कौतुक केलं आहे. देशासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. अशा प्रकारचा निर्णय मागच्या ७० वर्षांत झालाच नाही, असं मत तिनं मांडलं. महिला या नेहमीच शोषणाच्या बळी ठरतात. त्यांना आरक्षण, संरक्षण व सन्मान देणं हे सरकारचं काम आहे. ते मोदी सरकारनं केलं आहे, असं कंगना म्हणाली.