Kali River Bridge Collapse Video : कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांना जोडणारा काली नदीवरील पूल काल मध्यरात्री कोसळला. कारवारच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. या अपघातात पुलावरून जाणारा एक ट्रक नदीत कोसळून वाहून गेला असून ट्रक चालक बचावला आहे. ही घटना बुधवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली आहे. ट्रक शिवाय आणखी किती वाहने नदीपात्रात पडली आहेत याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. जलतरणपटूंच्या मदतीने पोलीस शोध घेत आहेत. या अपघाताची दृश्ये हादरवून टाकणारी आहेत.