Maharashtra Assembly Elections 2024 : महाविकास आघाडीच्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सभा घेतली. या सभेत जयश्री शेळके यांनी जोरदार भाषण केलं. शेरोशायरी आणि म्हणींचा वापर करत त्यांनी महायुती सरकार आणि प्रतिस्पर्धी उमेदवार संजय गायकवाड यांच्यावर शेलक्या शब्दांत हल्ला चढवला. समोरचा उमेदवार वाघाच्या पोषाखातला लांडगा आहे. त्याला घाबरायची काही गरज नाही. त्यांच्या गळ्यात जसा वाघाचा नकली दात आहे, तसाच तो माणूसही नकली आहे, असा घणाघात शेळके यांनी केला.