Jayant Patil speech Video : भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. कागल विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढणार आहेत. यावेळी गैबी चौकात झालेल्या जाहीर सभेत जयंत पाटील यांचं भाषण झालं. लोकसभेच्या आधी अनेक लोक आम्हाला सोडून गेले. मी त्यांना सांगत होतो असं करू नका. शरद पवारांना अंगावर घेऊ नका. त्यांच्या वाट्याला जाऊ नका. कपाळमोक्ष ठरलेला आहे. पण त्यांनी ऐकलं नाही. सत्तेसोबत गेल्यावर काही काळ संरक्षण मिळेल. पण कायदा बदलत नसतो, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला. त्यांचा रोख हसन मुश्रीफ यांच्याकडं होता.