मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : एखादा क्लार्क जे सर्टिफिकेट देऊ शकतो, ते देण्यासाठी CM जातात; सरकारी उधळपट्टीवर जयंत पाटील यांचा घणाघात

Video : एखादा क्लार्क जे सर्टिफिकेट देऊ शकतो, ते देण्यासाठी CM जातात; सरकारी उधळपट्टीवर जयंत पाटील यांचा घणाघात

Jul 03, 2024 07:59 PM IST

Jayant Patil speech on budget : अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विधानसभेत चर्चा सुरू आहे. या अर्थसंकल्पावर बोलताना माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या पैशाच्या उधळपट्टीवर जोरदार टीका केली. रोजगार मेळावे आणि शासन आपल्या दारी यांसारख्या कार्यक्रमांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. त्याची गरज नाही. जी सर्टिफिकेट क्लार्क, नायब तहसिलदार किंवा तहसिलदार देऊ शकतो, ती देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जातात. त्यासाठी लोकांना १५-१५ दिवस थांबवून ठेवतात. शिवाय या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अनेक लोकांवर जबरदस्ती केली जाते. कार्यक्रम घ्यायला हरकत नाही, पण त्यावर अकारण पैशाची उधळपट्टी नको, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp