Jayant Patil video : लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यात निष्ठावंतांचे मेळावे सुरू केले आहेत. धुळ्यातील सिंदखेडा इथं झालेल्या मेळाव्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज महायुती सरकार व भाजपवर तोफ डागली. भाजपमध्ये काही लोकांनी निष्ठावंतांना बाजूला सारून स्वत:च्या टोळ्या तयार केल्या आहेत. त्यामुळं अनेक निष्ठावंत पक्ष सोडून जात आहेत, असं जयंत पाटील म्हणाले. त्यांचा रोख देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता.