Jayant patil slams Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षाच्या दोन गटांनी मुंबईत आज स्वतंत्र मेळावे घेऊन आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरांच्या मेळाव्यात काही नेत्यांनी आपला निर्णयाचं समर्थन करताना काही प्रश्न उपस्थित केले होते. या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी घणाघाती भाषण केलं. आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, असं म्हणणाऱ्या छगन भुजबळ यांच्यावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. महात्मा फुले आणि सावित्रीदेवी फुले यांची चेष्टा करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसता. महाराष्ट्राला तुम्ही काय उत्तर देणार, असा सवाल जयंत पाटील यांनी भुजबळांना केला.