शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा अहिल्यानगर येथील राहुरी इथं पोहोचल्यानंतर तिथं जाहीर सभा झाली. यावेळी पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी वेगवेगळ्या राजकीय विषयांवर भाष्य केलं. उद्याच्या निवडणुका राज्याचं राजकारण बदलणाऱ्या आहेत. त्यामुळं सर्वांनी जागरूक राहून मतदान करणं गरजेचं आहे. सत्ता येत नाही हे दिसल्यावर हे लोक सैरभैर झालेत. जातीय दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यांचेच आमदार 'हिंदू खतरे में' म्हणत राज्यात फिरत आहेत. याचा अर्थ भाजप सत्तेवर असताना हिंदूंना धोका असतो हे लक्षात ठेवा, असा टोला जयंत पाटील यांनी हाणला.