मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : 'लाडकी बहीण' योजनेचे फॉर्म देण्याच्या नावावर महिलांची फसवणूक

Video : 'लाडकी बहीण' योजनेचे फॉर्म देण्याच्या नावावर महिलांची फसवणूक

Jul 03, 2024 07:04 PM IST

Jayant Patil on Majhi Ladki Bahin Yojana : राज्यातील महायुती सरकारनं नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. या योजनेची नोंदणी सुरू झाली आहे. मात्र, ती करताना तलाठी लाच घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तसंच, काही राजकीय कार्यकर्ते स्वत:चे फोटो लावून योजनेचे अर्ज वाटत असून त्यासाठी पैसे घेत आहेत. राज्यभर महिलांची फसवणूक सुरू आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार जयंत पाटील यांनी सरकारच्या निदर्शनास आणलं.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp