कोस्ट गार्ड ठरले देवदूत! वाचवले १९ जणांचे प्राण, पाहा Video
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  कोस्ट गार्ड ठरले देवदूत! वाचवले १९ जणांचे प्राण, पाहा Video

कोस्ट गार्ड ठरले देवदूत! वाचवले १९ जणांचे प्राण, पाहा Video

Published Sep 17, 2022 03:34 PM IST

  • Indian Coast Guard: रत्नागिरी जवळच्या समुद्रात अडकलेल्या एका व्यापारी जहाजावरील १९ जणांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. त्यात १८ भारतीय आणि एका इथिओपियन नागरिकाचा समावेश होता. मोटार टँकर पार्थ, गॅबॉन हे जहाज रत्नागिरी किनार्‍यापासून सुमारे ४१ मैल पश्चिमेला समुद्रात अडकले होते. हे जहाज यूएईच्या खोर फक्कन येथून न्यू मंगलोरला जात होते. मात्र, वादळी वाऱ्यामुळं जहाजाचा अपघात झाला आणि ते बुडण्याची शक्यता दिसू लागली. हे लक्षात येताच जहाजातील १९ जणांनी सुरक्षा बोटीचा आधार घेत जहाज सोडले आणि मदतीची मागणी करणारे संदेश पाठवले. भारतीय तटरक्षक दलानं एमआरसीसी मुंबई यांच्या साहाय्यानं ICGS सुजीत आणि ICGS अपूर्व ही गस्तीवरील जहाजं अपघातग्रस्त जहाजाच्या दिशेनं पाठवली. जहाजावरील जवानांनी हेलिकॉप्टरच्या साह्याने १९ जणांचे प्राण वाचवले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp