Maharashtra Assembly Election : ‘पंतप्रधान पदावरील व्यक्तीनं संपूर्ण देशाचा विचार करायला हवा. पण, नरेंद्र मोदी हे फक्त गुजरातसाठी काम करतात. तेच करायचं असेल तर पंतप्रधान कशाला झालात, तिथं जाऊन मुख्यमंत्री व्हा,’ असा बोचरा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नरेंद्र मोदी यांना हाणला. बारामती विधानसभा मतदारसंघातील सुपा इथं युगेंद्र पवार यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला.