Sanjay Raut Video : बीडमधील सुपारी हल्ल्यावरून उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षाला इशारा देणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी आज घणाघाती टीका केली. बाळासाहेबांच्या मुलाला आणि शिवसेनेला आव्हान देताय का? हिंमत असेल तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अहमदशाह अब्दालीला आव्हान द्या. आम्हाला कसलं आव्हान देता? आम्ही ईडीपुढं शेपट्या घातल्या नाहीत. आम्ही तुरुंगात गेलोय, आमचे लोक तुरुंगात गेलेत, असं राऊत यांनी राज ठाकरेंना सुनावलं.