Devendra Fadnavis at dharmaveer 2 premiere : आनंद दिघे यांच्या जीवनावरील 'धर्मवीर २' सिनेमाचा प्रीमियर सोहळा २६ सप्टेंबर रोजी ठाण्यात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटाचं व चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं. दुसर्या चित्रपटामुळं आनंद दिघे यांची संघर्षगाथा लोकांपर्यंत जाण्यास मदत होईल. मलाही या चित्रपटाविषयी उत्कंठा आहे. हा सिनेमा सर्वांना आवडेल. सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पाहावा, असं आवाहन फडणवीस यांनी केलं. धर्मवीर ३ ची पटकथा मी लिहीन, असं फडणवीस यांनी मिश्किलपणे सांगितलं.